मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!! शेकडो पदांवर भरती सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी ते पदवी उत्तीर्णांना मोठी संधी चालून आलीय. मुंबई महानगरपालिकामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

कनिष्ठ लघुलेखक (E-C-M) पदांच्या 226 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार BMC च्या  www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
(i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण  (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि.   (v) MS-CIT

नोकरीचे ठिकाण – मुंबई.
पगार – M15 (Pay Matrix ) २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १००० रुपये
मागास / इतर मागास प्रवर्ग – ९०० रुपये
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

महत्वाच्या तारखा –
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १५ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online