जळगाव । उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-गोरखपूर आणि मुंबई-दानापूर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.
यात लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष ही ०१०८३ विशेष गाडी शनिवार दि. २० एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. तसेच ०१०८४ विशेष गाडी सोमवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुरहून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपुर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती येथे थांबणार आहे. या गाडीला १८ डबे असतील.
तसेच ०१०८५ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून रविवार दि. २१ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१०८६ विशेष गाडी मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोटिट मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ०१०८१ विशेष गाडी रविवार, दि. २१ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता लोटिट मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता दानापूर येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी ०१०८२ विशेष गाडी सोमवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजता दानापुरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोटिट मुंबईला पोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे थांबेल