मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात काही दिवसापूर्वी एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. यानंतर आता पोलिसांनी पुन्हा एकदा स्कॉर्पिओ वाहनातून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई खामखेडा स्मशानभूमीजवळ करण्यात आली. याप्रकरणी वाहनचालक अजीज शेख बाबू (वय ३६) रा. झाशी नगर, रिसोड, जि. वाशिम याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांना बर्हाणपूरवरून एक स्कॉर्पिओतून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून काल रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास एमएच२७ डीएल-२४९६ क्रमांकाच्या स्कॉर्पिओला थांबविले असता यातून २२ लाख ३८ हजार ५० रूपयांचा अवैध गुटखा आढळून आला.
पोलिसांनी गाडीचा चालक अजीज शेख बाबू शेख (रा. झांसी नगर, रिसोड, जिल्हा वाशिम) याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर कारवाई ही डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरिक्षक राहूल बोरकर, राजेंद्र खनके, छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे व निखील नारखेडे यांच्या पथकाने केली.