तरुण भारत लाईव्ह । ३१ ऑगस्ट २०२३। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे आज दर्शन घेतले. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , तसेच महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले.
यादरम्यान नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपूजा आणि आरती केली. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांचा श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देऊन सन्मान केला.