तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात येत असून ते जळगाव येथून हेलिकॉप्टरने पाचोरा आणि तेथून पाळधील जाणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर ते मुंबईसाठी रवाना होतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत विमानाने दुपारी बारा वाजता जळगावला येतील. विमानतळावरून हेलिकॉप्टरने पाचोराकडे रवाना होतील. बारा वाजून पंधरा मिनिटांनी हडसन पाचोरा येथे पोहोचतील. दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या उपस्थितीत एम एम कॉलेजच्या मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी खाजगी कंपनीचे उद्घाटन एमआयडीसीच्या मौजे निंभोरा तालुका भडगाव व पाचोरा येथे 50 खात्यांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मुख्य इमारती बांधकामाचे पूजन केले जाणार आहे.
दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्री हडसन येथून हेलिकॉप्टरने पाळधीला रवाना होतील चार वाजून वीस मिनिटांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील. सायंकाळी पाच वाजता पाळधी येथून हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी जळगाव विमानतळावरून मुंबईला रवाना होतील. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे देखील येण्याची शक्यता आहे.