---Advertisement---

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : राज्यातील ६ हजार २०० रुग्णांना ‘इतक्या’ कोटींची मदत

---Advertisement---
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून रुग्णांना दिलासा देण्यात येत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून देऊन काम करीत आहे.
 या कक्षामार्फत पहिल्याच म्हणजे जुलै २०२२ या महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १० कोटी २७ लाख आणि मार्च २०२३ मध्ये विक्रमी ११ कोटी ९५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment