मुदत संपली; आता न पाणी, ना उपचार

तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासाठी शासनाला दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजपासून पाणी उपचार बंद केल्याचे अंतरवाली सराटी येथील उपोषण कर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. २८ ऑगस्ट पासून मराठी आरक्षणासाठी जरांगे  यांचे उपोषण सुरू आहे.

१सप्टेंबर रोजी येथील उपोषणकर्त्यांवर लाठी  हल्ला झाल्यानंतर प्रकरण चिघळले आहे. आजवर शासन स्तरावरून उपोषणकर्त्यांशी शिष्टमंडळामार्फत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. शासनाने काढलेल्या जीआर मध्ये बदल करत सरसकट प्रमाण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासह इतर मागण्या जरांगे यांनी केला होत्या. शासनाने जीआर मध्ये काही बदल केले परंतु ते बदलही अपेक्षित झाले नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. शासनाला दिलेली चार दिवसांची मुदत संपली आहे

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथी गृहात होणाऱ्या या बैठकीला सत्ताधारी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बोलवले आहे. सर्वपक्षीयांना माझी हात जोडून विनंती आहे कोणीही यात अडकाठी करू नका  होणाऱ्या सर्वपक्षीय च्या बैठकीपूर्वी रात्रभर गोरगरिबांच्या मुलांचा आयुष्य डोळ्यासमोर आणावे. सर्वपक्षीयांनी योग्य मार्ग काढावा असे सात उपोषण करते जर अंगी यांनी घातली