---Advertisement---

मुलाचा मृत्यू, पित्यानेही सोडले प्राण; रावेरमधील घटना

---Advertisement---

जळगाव : मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वृद्ध पित्याचा मृत्यू झाल्याची घटना रावेर येथे शुक्रवार, 24 रोजी घडली. मुलगा किरण मधुकर महाजन (४७) आणि वडील मधुकर विश्राम महाजन (६५) अशी मृतांची नाव आहे.

रावेर शहरातील स्वामी विवेकानंद चौकालगत पाटील वाड्यात मधुकर महाजन हे वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. इकडे मुलगा किरणचे लग्न झाले. त्याला दोन मुले झाली. मध्येच पती-पत्नीत वाद झाला आणि किरणशी पत्नी माहेरी निघून गेली. घराचे घरपण हरपले आणि जीवनात एक संघर्ष सूरू झाले. यानंतर पिता-पुत्रांनी हात गाडीवर भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. यातून पटाची खळगी भरण्यास सुरुवात केली. कधी मग उपासही घडायचा. असा दिनक्रम सुरू असताना शुक्रवार 24 रोजी सकाळपासून किरण यास ताप आला. अशक्तपणा जाणवू लागल्याने त्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले आणि घरी आला. काही वेळातच दुपारी बाराच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

इकडे आयुष्याचा आधार ठरलेल्या किरणची मृत्यूची वार्ता कळताच पित्यानेही जगाचा निरोप घेतला. पिता पुत्राची सायंकाळी एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment