नंदुरबार : राज्यासह जिल्ह्यात गुन्हे गारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच एकाच रात्रीत चक्क ७ घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना शहाद्यात घडलीय. विशेषतः मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले साहित्य लंपास केले. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, जिल्ह्यातील शहादा शहरातील कुकडेल भागात ही घटना घडलीय. यावेळी चोरटयांनी तब्बल सात घरांमध्ये घरफोडी करून लाखोच्या ऐवज लंपास केला. दरम्यान, परिसरात तीन दिवसापूर्वी जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर परिसरातील अनेक परिवार सुरक्षिततेच्या कारणासाठी परिसरातून बाहेर गेले होते.
याच संधीचा फायदा घेत बंद असलेल्या घरांवर चोरट्यांनी हात साफ केला असून मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या मेवाती परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नासाठी साहित्याची खरेदी केली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या तणावानंतर हा परिवार आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेला होता. याच काळात बंद असलेल्या घरावर चोरट्यांनी हात साफ केले आहेत.