अल्पवयीन मुलीला घरात एकटी पाहून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर मुलीची आई घरी परतली असता निरागस बालक रडत होते, तिची विचारपूस केली असता पीडितेने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. दरम्यान, मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर दुसऱ्या घटनेत एका 28 वर्षीय अपंग मुलीवर (जन्माने मुकी) तिच्या गावातील एका तरुणाने जंगलात गुरे चरत असताना अत्याचार केला. पीडितेने हातवारे करून घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. झारखंडमधील दुमका येथे या दोन्ही हृदयद्रावक घटना समोर आल्या आहे.