मुली सिगरेट पितात हे काकांना आवडलं नाही म्हणून चक्क कॅफेच जाळला

तरुण भारत लाईव्ह । १२ ऑक्टोबर २०२३। मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका वृद्धाने मुली, महिलांनी सिगारेट ओढल्याने संतापलेल्या या व्यक्तीने धडा शिकवण्यासाठी चक्क कॅफे पेटवून दिले. यामध्ये कॅफे मालकाला सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. गमतीची गोष्ट म्हणजे या वृद्ध व्यक्तीला शहेनशाह चित्रपटातील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेने खूप प्रभावित केले होते आणि त्यांना त्याच पद्धतीने समाजात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती. कॅफेला आग लावताना हे वृद्ध सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडले गेले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

मुली सिगरेट पितात म्हणून चक्क एका व्यक्तीने संपूर्ण कॅफेलाच आग लावली. ८० च्या दशकातील अँग्री यंग मॅन म्हणून बॉलीवूड इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण करणारे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर रोजी ८१ वा वाढदिवस होता. हे सांगण्याचं कारण असं की, अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ या चित्रपटातील ‘विजय श्रीवास्तव’ हे पात्र या व्यक्तीस फार भावलं. या पात्रातून प्रेरणा घेत या व्यक्तीने समाजातील तरुणींना सिगारेट पिण्यापासून परावृत्त करण्याचा ध्यास घेतला आहे. यातूनच त्यांनी चक्क अख्खा कॅफेच जाळून टाकला.

इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील स्काय कॉर्पोरेटच्या कॅफेमध्ये हा अपघात घडला. कॅफेला लागलेल्या आगीचे कारण शोधण्यासाठी ते चालवणाऱ्या शुभम चौधरीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती आग लावल्यानंतर निघून जाताना दिसली. यानंतर कॅफेचालक चौधरी यांनी याबाबत लासुडिया पोलिसांकडे तक्रार केली. त्याआधारे पोलीस ठाण्याचे प्रभारी तारे सोनी यांनी पथक तयार करून आरोपीला अटक केली. विजय माथे असे या वृद्धाचे नाव असून तो गल्ली क्रमांक ७८ मध्ये राहणारा आहे.