मुस्लिम तरुणांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत ओवैसींना दाखवले काळे झेंडे

सुरत : गुजरात विधानसभा निवडणुकीचा ज्वर संपूर्ण देशावर चढायला सुरुवात झाली आहे. यंदा गुजरातमध्ये काँग्रेस, आप व एमआयएम पक्षाने मोठी ताकद लावली आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी मुस्लिमबहुल भागात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत मोठमोठ्या रॅली काढत आहेत. मात्र ओवैसींना गुजरातमधील मुस्लिम तरुणांनी जोरदार धक्का दिला आहे. ओवैसींची सुरतमध्ये सभा सुरु असतांना मुस्लिम तरुणांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत ओवैसींना काळे झेंडे दाखवले आणि गो बॅकच्या घोषणा दिल्या. या प्रकारामुळे भांबावले ओवैसी हे सर्व पाहत राहिले.

गुजरामध्ये ओवैसींना मुस्लिम समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सूरतच्या रॅलीत मुस्लिम तरुणांनी ओवैसींना काळे झेंडे दाखवले आणि गो बॅकच्या घोषणा दिल्या. सूरतच्या सभेत भाषण देण्यासाठी ओवैसी स्टेजवर उभे राहताच तेथे उपस्थित मुस्लिम तरुणांनी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

ओवैसींची खोचक प्रतिक्रिया

एका टीव्ही चॅनलवरील एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांना सूरतमध्ये काळे झेंडे दाखवून मोदी-मोदी घोषणा दिल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी खोचक प्रतिक्रीया दिली आहे. दुसरा दिवस बालदिन होता, त्यामुळे मुलं पापा-पापा अशा हाका मारायला लागेल, तर मी काय करू शकतो. झालेल्या विरोधाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले, मी बिल्किस बानोचा उल्लेख केल्यामुळे त्यांना वाईट वाटल्याचे नंतर कळले. मी केडियामध्ये मारल्या गेलेल्या मुलांचा उल्लेख केला. मी डिस्टर्ब एरिया ऍक्टचा उल्लेख केला. तिथे लोकांना पिण्याचे पाणी नाही, असे ओवेसी यांनी सांगितले. आपण बिल्किस बानोसाठी आवाज उठवत असल्यानेच आपला विरोध केला जात असल्याचेही ओवेसी म्हणाले.