मुस्लिम तुष्टीकरणाचा नवा राक्षस !

अग्रलेख

मुस्लिमांचे तुष्टीकरण करून काँग्रेस एवढी वर्षे सत्तेत राहिली. देशातील बहुसंख्य हिंदूंची उपेक्षा आणि अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांचे तुष्टीकरण हा काँग्रेसचा राजधर्म होता. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाची काँग्रेसची री आता पश्चिम बंगालमध्ये ओढत आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी यासंदर्भात केलेला आरोप धक्कादायक तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा देशविघातक चेहरा समोर आणणारा आहे.बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना राज्यात ओबीसींच्या नावावर मिळत असलेले आरक्षण हे हिंदूंपेक्षा जास्त आहे, हा अहिर यांनी केलेला आरोप राजकीय फायद्यासाठी एखादा नेता कोणत्या थराला जाऊ शकतो, हे दाखवणारा आहे. अन्य मागासवर्गीय म्हणून ओळखल्या जाणा-या ओबीसी समाजाला सध्या देशातील बहुतांश राज्यात काही प्रमाणात आरक्षण मिळते आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या देशात असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षणाची ही टक्केवारी अतिशय कमी आहे, यात संशय नाही. त्यामुळे आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाजाने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

जातिनिहाय जनगणनेची मागणी हा त्या आंदोलनाचाच भाग आहे. एकदा कोणत्या जातीचे किती लोक देशात आहेत, हे समजल्यानंतर त्या टक्केवारीच्या आधारावर आरक्षणाची मागणी केली जाऊ शकते. यातून मोठ्या प्रमाणात समाजात वर्गसंघर्ष तयार होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, या भीतीने केंद्र सरकार सध्या तरी जातीय जनगणनेच्या मागणीला तयार नाही. केंद्र सरकारची ही भूमिका चुकीची आहे, असे कोणी म्हणू शकणार नाही.  आपल्या देशात जे आरक्षण आज मिळते आहे, ते सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मागासलेपणाच्या निकषावर. धार्मिक निकषावर आपल्याकडे कोणतेही आरक्षण दिले जात नाही. धार्मिक निकषावर आरक्षण देणे योग्यही नाही. त्यामुळेच आपल्याकडे आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी अधूनमधून केली जात असते. सध्या देशात अनुसूचित जाती आणि जमातीला आरक्षण मिळते आहे. याशिवाय ओबीसींनासुद्धा काही प्रमाणात आरक्षण दिले जाते.

पश्चिम बंगालमध्ये मात्र आपण आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे दाखवत मुस्लिम समाजातील मोठा वर्ग ओबीसींच्या आरक्षणाचा मोठा हिस्सा बळकावत असल्याचे धक्कादायक वास्तव हंसराज अहिर यांच्या पत्रपरिषदेतून समोर आले आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ओबीसींच्या आरक्षणातील लोण्याचा गोळा पळवणारे बांगला देश आणि म्यानमारमधून आलेले मुस्लिम घुसखोर आहेत आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी ममता बॅनर्जी या मुस्लिम घुसखोरांची पाठराखण करीत आहेत, हे त्याहून जास्त धक्कादायक आहे. या मुस्लिम घुसखोरांना ओबीसीत सामावून घेण्यासाठी जे निकष आहेत, ते चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आले वा त्याची मोडतोड करण्यात आली, हे उघड आहे. राज्यातील १७९ जातीचा मागासवर्गीयात म्हणजे ओबीसीत समावेश होतो; त्यातील ११८ म्हणजे दोनतृतीयांश जाती या मुस्लिम समाजातील आहेत.फक्त ६२ जाती या हिंदू आहेत. ममता बॅनर्जी यांनी ३०-३५ वर्षांपासून राज्यात असलेली माकपची राजवट मोडून काढत दणदणीत विजय मिळविला; एवढेच नव्हे, तर तृणमूल काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक करीत सलग तिस-यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा बहुमानही पटकावला. ममता बॅनर्जी या आक्रमक नेत्या आहेत. त्यांची राहणी अतिशय साधी आहे, याबाबत शंका नाही.

या दोन मुद्यांमुळेच पश्चिम बंगालमधील जनतेच्या मनावर छाप पाडण्यात त्या यशस्वी झाल्या, असे आतापर्यंत वाटत होते. पण अहिर यांच्या दाव्याने सलग तिस-यांदा सत्तेवर येण्यामागचे त्यांचे पितळ उघडे पडले, असे म्हणायला हरकत नाही.सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी यांनी हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचे राज्यातील गेल्या काही वर्षांतील घटनाक्रमावरून लक्षात येते. राज्यात आतापर्यंत जेवढ्या दंगली झाल्या, त्यात हिंदू समाजाला मार खावा लागला. हिंदू मुली आणि महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या, पुरुषांच्या अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्या. राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी हिंदू समाजाच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली.तृणमूल काँग्रेसच्या गुंडांसोबत पोलिसी अत्याचाराचाही सामना करावा लागला. हिंदू जनतेच्या तसेच भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येची जी छायाचित्रे आणि तपशील समोर आला, तो अतिशय नृशंस असा होता. यातून कोणताही माणूस एवढा क्रूर कसा होऊ शकतो, असा प्रश्न सर्वांना पडत होता.  राजकीय विचारधारा म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपाचा विरोध करणे एकवेळ समजू शकते, पण स्वत: हिंदू असताना हिंदू लोकांबद्दल त्यांच्या मनात एवढी घृणेची भावना का? याचे उत्तर आतापर्यंत मिळू शकले नाही.

राजकीय फायद्यासाठी हिंदू समाजाची उपेक्षा करीत ममता बॅनर्जी मुस्लिम घुसखोरांचे तुष्टीकरण करतात, हे उघडपणे दिसत आहे. पण हिंदू समाजाचे तुष्टीकरण करून नव्हे, तर त्यांना त्यांचा न्याय, हक्क आणि अधिकार देऊनही ममता बॅनर्जी हिंदू समाजातील लोकांची मने आणि मते दोन्ही जिंकू शकल्या असत्या. ममता बॅनर्जी आज तृणमूल काँग्रेसच्या नेत्या असल्या, तरी त्या मूळ काँग्रेसीच आहेत. हिंदूंची उपेक्षा तसेच मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्याचे धोरणच त्या राबवत आहेत. मुस्लिमांचे तुष्टीकरण करून निवडणूक जिंकणे अतिशय सोपे आहे आणि त्याचाच वापर करीत ममता बॅनर्जी आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये आपली निरंकुश सत्ता राबवत आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने याबाबतचा जाब पश्चिम बंगाल सरकारला विचारताच सरकारने आरक्षणाचा लाभ घेणारे मुस्लिम घुसखोर आधी हिंदूच होते, असे निर्लज्जपणाचे उत्तर दिले.मुळात एखादा माणूस हा त्यांच्या भूतकाळात काय होता, यापेक्षा आज तो काय आहे, याचा विचार सरकारी यंत्रणेने करायला हवा होता. पण आपल्या धन्याच्या वा धनीच्या इशा-यावर राज्य सरकारने असा विचार केला नसावा, असे वाटते.

तुम्ही जर आधी हिंदू होता, तर मग मुस्लिम धर्म का स्वीकारला, याचे उत्तर द्यायला हवे आणि हिंदू धर्मातील आरक्षणादी फायदे तुम्हाला लाटायचे असतील तर तुम्ही मुस्लिम धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करायला हवा होता. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर तुम्ही ओबीसी समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेतला असता, तर त्याला कोणाचीच हरकत राहिली नसती.  मात्र, आधी दुसèया देशातून म्हणजे बांगला देश आणि म्यानमारमधून भारतात घुसखोरी करायची, हा पहिला गुन्हा आणि घुसखोर म्हणून हिंदूंच्या न्याय अधिकारांवर म्हणजे आरक्षणावर अतिक्रमण करायचे हा दुसरा गुन्हा झाला. या दोन्ही गुन्ह्यांना माफी नाही. या दोन्ही गुन्ह्यांची शिक्षा मुस्लिम घुसखोरांना व्हायलाच पाहिजे. कारण तुम्ही आरक्षणाचा लाभ घेत हिंदू समाजावर अन्याय करता यापेक्षा तुमच्या घुसखोरीमुळे देशाची एकता आणि अखंडता तसेच राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते आणि हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिम घुसखोरांच्या या समस्येवर तातडीने आणि कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. दु:ख म्हातारी मेल्याचे नाही काळ सोकावतो, त्याचे आहे