मुंबई : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेण्ड आफताबने तिचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. या प्रकरणावर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. संवेदनशील अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील या प्रकरणी पोस्ट करत आपलं परखड मत मांडलं आहे. मेरा अब्दुल ऐसा नही हैं म्हणत किती मुलींचे जीव जाणार आहेत असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
केतकीने फेसबुकवर एक पोस्ट करत लिहिलं, ‘मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?’ असं लिहत तिने जागो मेरे देश असा हॅशटॅगही वापरला आहे. शेवटी भारत माता की जय असेही लिहिले आहे.
केतकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. अनेक नेटकर्यांनी याप्रकरणी तिचं समर्थन केलं आहे. तिच्या विचारांना पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करुन मत व्यक्त करत आहेत. यामध्ये तिला समर्थन देणार्यांची संख्या जास्त आहे.