मेलबर्न मधील गणेशोत्सव

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। मराठी मनातील अगदी प्रिय दैवत म्हणजे आपला गणपती बाप्पा. सर्वत्र चैतन्य आणि उत्साह संचारते बाप्पाच्या आगमनाने! दरवर्षी घराघरात साजरा होणारा हा सण आपण लहानपणापासनू अनभुवतो आणि त्यातनू खपू सारे संस्कार नकळत मनावर होतात. परदेशात राहणार्या प्रत्येक मराठी माणसाला या वेळी अजनूच प्रकर्षाने मायभूमीची आणि घरची आठवण होते.

आपल्या मुलांना या सणाचा आनंद, आपली संस्कृती  कळावी अशी त्याची धडपड असते. एक छान गोष्ट म्हणजे हल्ली सर्व देशांमध्ये गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात आणि उत्तम पद्धतीने, जल्लोषात साजरा होतो. ऑस्ट्रेलि यातील मेलबर्न हेदेखील त्याला अपवाद नाही. मेलबर्न हे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणनू गौरवले जाते आणि गणपती उत्सवाच्या बाबतीतही ते मौज, आनदं , भक्ती, शास्त्र आणि त्याच वेळी पर्यावरणाची जाणीव यांचे एक आदर्श उदाहरण आहे.

३० वर्षांपूर्वी जेव्हा मेलबर्न मध्ये मराठी कुटुंबे फारच कमी होती, तेव्हा गोखले कुटुंबाने मेलबर्न मधील पहिला सार्वजर्वनि क गणपती उत्सव सरूु केला. ३० वर्षांपूर्वी  त्या मिरवणुकीत ५० लोकांनी भाग घेतला आणि विसर्जन समद्रुात करण्यात आले. ही परंपरा आजतागायत अधिकाधिक उत्साहाने सुरु आहे. आता मेलबर्न मध्ये तीन महाराष्ट्र मडंळे आणि इतर अनेक सार्वजर्वनि क गणपती आहेत.

सिद्धेश जकुर गेल्या १५ वर्षां पासनू आपल्या घरी हा उत्सव साजरा करतो. सूरवातीच्या दिवसांत तो आपल्या सर्व मित्रांना शहरातील त्याच्या लहानशा अपार्टमेंट मध्ये आमत्रिंत करायचा. छोट्याश्या जागेत आरती हा एक मोठा कार्यक्रम असे. एक उंच माणसू हातात फडके घेऊन खुर्चीवर उभा राही आणि फायर अलार्म वारा घालत बसे. त्या आठवणीतल्या मजेशीर दिवसांपासनू बदलत जाऊन आता तो एक व्यवस्थित सुंदर उत्सव बनला आहे. भारतात सिद्धेश आणि मी (नेहा) एकाच शाळेत होतो जिथे आम्हाला ‘मदुाकारात्त मोदकं’ ही प्रार्थना शिकवत असत. यावर्षी आरती दरम्यान ती प्रार्थना  गाऊन आम्ही आमच्या शालेय दिवसांची पुनरावृत्ती केली. या प्रमाणे मेलबर्न मध्ये उत्सवाचा आत्मा सुंदरपणे जागृत  केला जातो.

त्याच वेळी, लोक उत्सव पर्यावरणपूरक बनवण्याबद्दल जागरूक आहेत. रोहन शृंगारपुरे हे त्याचे एक उदाहरण आहे. १० वर्षांपर्वीू  त्याच्या कुटुंबाने रोहनच्या मेलबर्न मधील घरी गणपती हलवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कडे भारतात एका विशिष्ट साच्याची मर्तीू  बनतात. रोहन परंपरा बदलू इच्छित नव्हता. पहिल्या वर्षी , त्याने भारत मध्ये मर्तीू बनवनू घेऊन ती मेलबर्नला  मागवली. पण हे दर वर्षी करणे शक्य नाही हे त्याला लवकरच लक्षात आले. दसुऱ्या वर्षी मर्तीू कशी बनवायची ते तो स्वतःच शिकला आणि बाकी सारा तर इतिहासच आहे. आज रोहन पर्यावरणपूरक मर्तीू बनवण्याच्या कार्यशाळा  घेतो. या कार्यशाळांमध्ये  तो लोकांना नसैर्गिक साहित्य वापरून शाडूची मर्तीू र्ती कशी बनवायची ते शिकवतो. रोहनच्या कार्यशाळांबद्दल  बोलताना, तो म्हणाला, “प्रत्येकजण छोट्या-छोट्या गोष्टी करून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.” मेलबर्न मधील भारतीय दुकाने देखील भारतातुन  आयात केलेल्या इको फ्रेंडली गणेश मर्तीू  विकतात. गेल्या अनेक वर्षांत मी एकही मर्तीू अशी पाहिली नाही जी पर्यावरणपूरक  नाही. मेलबर्न मध्ये आता पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साजरा करण्याची एक परंपरा निर्माण झाली आहे.

मेलबर्न मध्ये लहान मुलं असलेल्या कुटुंबांसाठी “कुटुंब प्रबोधन” नावाचा एक उपक्रम चालवला जातो. यावर्षी कुटुंब प्रबोधन ग्रपु ने लहान मुलांसाठी  मर्तीू बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन केले. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक कुटुंबांनी त्यांच्या मुलांनी  बनवलेल्या मर्तीूची प्राणप्रतिष्ठा केली. कुटुंब प्रबोधनातील ५० जणांनी एकत्र जमून  अथर्वशिष्यचे सहस्रावर्तने केली.

जान्हवी पाटील तिच्या कुटुंबियां समवेत बरीच वर्षे परदेशात आहे. मेलबर्नमध्ये त्यांनी सहावर्षां पर्वीू घरी गणेशोत्सव साजरा करण्यास सरुुवात केली. तिला स्वतःला मूर्ती मखर, पेढे, उकडीचे मोदक सगळे करायची हौस! आरत्या, अथर्वशिष्य  पठण याची फार आवड. इथले स्थानिक डाॅ. प्रशांत जोशी यांनी तिला मातीपासनू मर्तीू कशी घडवायची ते शिकवले. इथे मिळणाऱ्या  स्थानिक मातीपासनू ती दरवर्षी मूर्ती  तयार करत पर्यावरणास हानि कारक होणार नाही अशा गोष्टी वापरून ते आरास करतात. त्यांचा मुलगाही  आणि त्याच्या मित्र- मत्रिैत्रिणी सुद्धा  फार उत्साहाने सहभागी होतात. या वर्षी त्यांनी “Wood burning technique” वापरून लाकडी चकत्यांवर 21 गणेशाची रूपेकोरली आहेत. त्यासमोर चदंनाची मूर्ती एका रंगातील मातीची गणेश मर्तीू र्ती स्थापन केली आहे.

गेली पाच वर्षे मेलबर्न मध्ये गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा पूजेचे पौरोहित्य  लाईव्ह ऑनलाईन केले जात. कोरोना व्हायरस असताना गणेश चतर्थीुला आपल्याला घरच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा समत्रंक आणि शास्त्रोक्त करता यावी म्हणनू हा प्रयोग सरूु झाला. एका सेशन मध्ये फक्त सात आठ कुटुंबे असतात आणि मेलबर्न  भावेल आणि शक्य होईल अशीच तरीही शास्त्रोक्त पूजा सांगितली जात. त्यामुळे गरुुजी प्रत्यक्ष जवळच असल्याचा समाधानकारक अनभुव येतो. मेलबर्न मध्ये खपू कमी मराठी परुोहि त असल्याने या पद्धतीमुळे अनेकांना शास्त्रोक्त पूजा करता येत. ५ कुटुंबांपासनू सरुु झालेल्या या उपक्रमातनू या वर्षी २१ कुटुंबांनी या अशा प्रकारे गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली. हे परुोहि त अनेक लहान मुलांना आरत्या आणि मंतपुष्पांजली  शिकवतात. या वर्षी लहान मुलांनी  मंत्रपुष्पांजलीची  त्यांच्या पालकां बरोबबर जुगलबंदी  केली.

“देवे” नावाच्या थोड्याशा जुगलबंदि  सारख्या वाटणाऱ्या या पाठात मंत्रांचे  दीर्घ स्वर श्वास संपेपर्यंत  लांबवले जातात. गणपतीच्या आरती नंतर  त्यांनी मोठ्याच उत्साहा ने उच्च स्वरात हे देवें म्हटले आणि इतर मुलांमध्येही   उत्सकुता निर्माण केली. पालकांनी मोठा आ केला,  माझ्या एका मित्रमैत्रिणींकडे अनेक जण जमून एकत्र उकडीचे मोदक बनवतात.

मोदक न येणाऱ्या लोकांना मोदक शिकवण्याचे काम अनभ वी मोदक मेकर्स करतात. हास्य, विनोद, भक्ती आणि कुतहूलाने भरलेला तो एक मोठा सोहळाच असतो. गणपतीला प्रसाद म्हणनू विकतचेगोड पदार्थ, फळे न आणता घरी बनवलेले आरोग्यास उत्तम असे पदार्थ आणावेत असा त्यांचा आग्रह असतो. अनेक कुटुंबे खपू जास्त साखर असलेली मिठाई टाळतात आणि आरोग्यदायी, शांत उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात.

अनेक अमराठी कुटुंबांनी देखील मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी नव्या आरत्या, भजने रचनू सोहळ्याला वेगळे स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे. सोनीपरिवाराची ही रचलेली आरती मुलांना फारच आवडत.

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मेलबर्न मा आव्या गणपती बाप्पा मोरया एक गली बेगली गणपती बाप्पा बाहुबली

मेलबर्न मधल्या गणपती बसवणाऱ्या बहुतके घरातनू असेच उत्साहाचे चित्र दिसत त्यांना हिंदू सण आणि मराठी परंपरा यांचा अभिमान आणि गणेशाप्रति भक्ति भाव तर असतोच, पण ऑस्ट्रेलियातील समाज आणि जीवनमुल्ले यांचे यथोचित भानही असते. गणेशोत्सवाच्या काळात ‘आपण आपल्या  मूळ भूमी पासनू हजारो मेल लांब अल्पसख्ंय म्हणनू राहतो’ हे आम्ही सारेच विसरून जातो.

नेहा कुंटे पाटोदेकर, संकेत  सांगवीकर, जान्हवी पाटील

 

संकलन : डॉ. पंकज पाटील जळगाव
संपर्क : 7588822126