जळगाव : मेहरूण गावाची परंपरा कायम राखत आज २० रोजी मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड सन 2024 ते 2029 च्या चेअरमनपदी सुनील वसंत वंजारी यांची व व्हाईस चेअरमनपदी जयंत किसन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर संचालक मंडळ म्हणून सुनील सुपडू महाजन, भागवत बुधो धांडे , ज्ञानेश्वर वामन नाईक, प्रमोद यशवंत नाईक, सुखदेव परशुराम सोनवणे , सुदाम दोधु पाटील , गणेश विठ्ठल सोनवणे, निरंजन जगन्नाथ पाटील, भूषण राजेंद्र सोनवणे, मंदाकिनी लक्ष्मण महाजन , सुनंदाबाई भास्कर नाईक, भागवत चावदस सानप तसेच तज्ञ्ज्ञ संचालकपदी योगेश पुंडलिक सांगळे ,जयराम नामदेव पाटील, अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे यांची निवड करण्यात आली.
यासाठी गावातील सर्व समाज बांधव, लोकप्रतिनिधींनीसह सुनील महाजन, प्रशांतभाऊ सुरेश नाईक, गणेश किसन सोनवणे, अशोक सिताराम लाडवंजारी, एस एस शिंदे सहकार अधिकारी व सचिव गोकुळ पाटील ज्ञानेश्वर यांनी सहकार्य केले.