राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रभू रामावर वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आले आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. अशातच संत महात्मांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणालेय जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज ?
राज सरकार आणि केंद्र सरकार मिळून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार नसेल तर “मैं स्वयं उसको मार डालूंगा, हमे चाहे फासी होने दो, संत समाज डरता नही है, इस तरह से अकबर के भक्तो को खुश करने की कोशिश की जा रही है,” असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते आव्हाड ?
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आहवाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. राम मांसाहारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते जंगलात शिकार करून खात. ते म्हणाले की 14 वर्षे जंगलात राहणारा माणूस शाकाहारी कसा होऊ शकतो ? त्यामुळे राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भाजपमध्ये संताप व्यक्त होत आहे. मुंबईत भाजप आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.