मोठा निर्णय! गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच, कधीपर्यंत लागू राहणार?

मुंबई : राज्य सरकारचे गोविंदांना  विम्याची रक्कम मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासकीय आदेश काढून राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले आहे.

किती आहे रक्कम
१८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. अतिरिक्त २५ हजार गोविंदाना राज्य सरकारने विमा कवच दिले आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याच्या सरकारने निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आता ७५ हजार गोविंदाना सरकारने शासकीय विमा कवच दिले आहे.

प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले. प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जख्मी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.