यावेळी पोलिसांनी तब्बल दीडशे किलोपेक्षा अधिक एमडी पावडर जप्त केली असून, या पावडरची विक्री कुठे अन् कशी केली जात होती याचे पाळेमुळे पोलिसांकडून शोधली जात आहेत. दरम्यान, वडाळागावातील अंमली पदार्थ निर्मितीचे रॅकेट राज्यभर असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
त्यांच्याकडून ५४.५ ग्रॅम वजनाची एम. डी. पावडर व १.२८८ किलो ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण १ लाख ८९ हजार २६० रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने दुपारपासून सापळा रचला होता. तसेच डमी ग्राहक पाठवून खात्री करून घेतली होती. एका किराणा दुकानात अंमली पदार्थ ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. यावेळी पोलिसांनी सर्व अंमली पदार्थ जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर, हेमंत नागरे, अश्विनी उबाळे, रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, गणेश भामरे, विनायक आव्हाड, नितीन भालेराव, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, गणेश वडजे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांनी सहभाग घेतला होता.