जळगाव । आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्यात दिवसेंदिवस मोठं मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यातील काँग्रेसला एकामागोमाग मोठे झटके बसत आहे. गेल्या काही दिवसात तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम केलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्याने शरद पवार गटाला मोठा झटका मानलं जात आहे. यामुळे विरोधी नेतेही संभ्रमात आहे.
याच दरम्यान,अनेक विरोध पक्षातील नेते मंडळी भाजपची वाट धरताना दिसत आहे. यातच एकनाथ खडसेही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. मात्र एकनाथ खडसेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ट्विट करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा माझ्याबाबत संभ्रम निर्माण व्हाव्या म्हणून पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे. असे त्यांनी नमूद केले आहे.