मुंबई : राज्याच्या राजकारणत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी मुंबईत नेते कार्यकर्त्यांच्या बैठका बोलवल्या आहेत.या अजित पवार यांच्या बैठकीला २३ आमदार पोहचले आहे तर शरद पवारांच्या बैठकीला नव आमदार पोचल्याचे सूत्रानुसार माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या बैठकीसाठी अजित पवारांचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार, शिरुरचे आमदार अशोक पवार आणि आमदार किरण लहामाटे हे काहीवेळापूर्वीच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार गटाकडे आतापर्यंत ४० आमदारांचे प्रतिज्ञापत्र आल्याची सूत्रांची माहिती होती. यादरम्यान अपक्ष देवेंद्र भुयार हे अजित पवार गटामध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र सध्यातर ते वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.