तरुण भारत लाईव्ह | नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने दोन्ही पक्षांची प्रचंड जोर लावला आहे. याच दरम्यान प्रक्षोभग विधाने केल्याप्रकरणी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांच्या विरोधात बंगळुरु पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
निवडणुकीनिमित्ताने घेण्यात आलेल्या भाजपाच्या मेळाव्यात अमित शाह म्हणाले होते की, ’काँग्रेसचे सरकार आल्यास कर्नाटकचे भवितव्य रिव्हर्स गियरने पाठिमागे जाईल. चुकूनही काँग्रेस आली तर आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवाद निर्माण होईळ. तसेच संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील. ही पिढी परिवर्तनाची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करू, असंही शाह म्हणाले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेस सत्तेत आल्यास शाह यांच्या दंगलीबाबतच्या विधानाचा दाखला देत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. एखाद्या सामान्य माणसाने असे केले असते तर त्याला अटक झाली असती. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय दंगली होतील हे केंद्रीय गृहमंत्री सांगू शकत नाहीत. ते गृहमंत्री आहेत, भाजपचे स्टार प्रचारक नाहीत.
Karnataka | Congress leaders Randeep Singh Surjewala, Dr Parmeshwar and DK Shivakumar file police complaint in Bengaluru's High Grounds police station against Union Home Minister & BJP leader Amit Shah and organisers of BJP rally for allegedly making "provocative statements,… pic.twitter.com/cxp4GfKnVd
— ANI (@ANI) April 27, 2023