Ram Temple : श्री राम मंदिरात प्रतिष्ठापणेची तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी वर्षात १५ ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी माहिती दिली.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले जाईल. तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. २४ – २५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाईल, तसेच त्यावर सोन्याचे नक्षीकाम असेल, असेही मिश्रा यांनी सांगितले.
मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावरही सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मंदिराची पायाभरणी होईल तेव्हाच अयोध्येला जाईन, असे पंतप्रधानांच्या मनात होते, म्हणूनच ते ५ ऑगस्ट २०२१ रोजी येथे आले होते.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, याआधी वीस वर्षांपासून पंतप्रधान मोदी येथे आले नव्हते. ते अयोध्येच्या जवळपास अनेक वेळा आले, पण इकडे आले नाहीत.