मुंबई : राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात तीन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. अशात शिवसेनेकडून 7 जागांवर दावा करण्यात आला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एक ते दोन दिवसांमध्ये हा विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्हाला तयारीत राहायला सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही तयारीत बसलो आहे. कधीही कॉल येईल तसं आम्ही निघू, असं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.