मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरण; आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर करु शकले नाहीत तर कोर्टाला वेळापत्रक ठरवावं लागेल, असा इशारा कोर्टाने दिलाय. तसेच विधानसभा अध्यक्षांना ही शेवटची संधी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता चांगलेच कामाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. तसेच त्यांची पुढचं कामकाज कसं असणार आहे? याबाबत महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, येत्या 30 ऑक्टोबरला नवे वेळापत्रक तयार करण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीवेळी नवे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात सादर केलं जातं का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.