मोठी बातमी! काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : आठ वर्षापूर्वीच्या ड्रग्ज प्रकरणात पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक करण्यात आली आहे. ते भुलत्थ मतदारसंघातून तीनदा आमदार झाले आहेत. या प्रकरणी येथील जलालबाद पोलीस ठाण्यात २०१५ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप खैरा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांना २०२१ मध्येही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.
सुखपाल सिंग खैरा यांना मार्च २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण ड्रग्जशी संबंधित असून, २०१५ मध्ये जलालाबाद सदर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. एफआयआरमध्ये नऊ जणांची नावे असून त्यापैकी एक गुरदेव सिंग आहे. गुरदेव सिंग हे खैरा यांच्या जवळचे मानले जातात. ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी फाजिल्का कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS) अंतर्गत दोषी ठरवले.
पोलिसांनी त्यांच्याकडून २ किलो हेरॉईन, २४ सोन्याची बिस्किटे, देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन पाकिस्तानी सिमकार्ड जप्त केले आहेत. आरोपींच्या चौकशीदरम्यान सुखपाल सिंग खैराचे नाव पुढे आले आणि त्यांना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी समन्स बजावण्यात आले. त्याचे गुरदेव सिंगसोबतचे संबंध पोलीस तपासत होते. समन्सबाबत खैरा यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, जिथे खैरा यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले समन्स आदेश रद्द करण्यात आले.