मोठी बातमी! कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलेले पथक परतले, हाती काय लागले?

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर, जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. अशातच कुणबी मराठा समाजाच्या नोंदी निजामकालीन असल्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठवाड्यातील  कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतीत सर्वच संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे एक पथक तयार करण्यात आले होते.

ज्यात, 1967  पूर्वीच्या निजामकालीन ‘कुणबी’ अशा नोंदी असलेली माहिती घेण्यासाठी विभागीय अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या नेतृत्वात हे पथक 13 सप्टेंबर रोजी हैदराबादला गेले होते.

या पथकाने हैदराबादमध्ये जुन्या रेकॉर्डची पाहणी केली. पथकाचा अंतिम अहवाल अद्याप आला नाही, परंतु खूप काही हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.