---Advertisement---

मोठी बातमी; चांद्रयान-3 पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं

---Advertisement---

श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-3 ने आज महत्वाचा टप्पा पार केला आहे. इस्रोने ट्विटकरुन नवे अपडेट्स दिले आहेत. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं आहे.

चांद्रयान -3 चे 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. या यानची यशस्वी वाटचाल सुरु आहे. १ ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान-3 ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेदरम्यान ही क्रिया पार पडेल.

चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल. यासाठी पृथ्वीच्या कक्षेतून ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाहेर पाठवण्यात आलं, त्याच्या अगदी उलट पद्धतीने चंद्राच्या कक्षेत ते प्रवास करेल.

सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास, २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर लँडिंग करु शकेल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment