मोठी बातमी ! छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, म्हणाले “मनोज जरांगे यांची दादागिरी..”

मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात आला, असून हे विधेयक एकताने मंजूर झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मराठा समाजाला नोकरीत तसेच शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होत असतानाच ओबीसी नेते छगन भुजबळ हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी मात्र पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?
मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरुन शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चाललीय, त्याला अटकाव करणार आहे की नाही. एसपी, अधिकाऱ्यांना भाडखाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे. ते म्हणतात हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, अशी दादागिरी चालणार नाही.. असे छगन भुजबळ म्हणाले.

यावेळी छगन भुजबळ यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलण्यासाठी अधिक वेळ देण्यास नकार दिल्याने भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तुमच्या चिंतेंबाबत मी नोंद घेतली आहे, सरकारनं उचित उपाययोजना करावी, असेही विधानसभा अध्यक्ष यावेळी म्हणाले.