जळगाव : जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. धरणगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
परेश नाईक, कैलास इंगळे,हरी चौधरी,आबा चौधरी,गणेश चौधरी,मयूर जाधव,सुदर्शन भागवत,अजय चौधरी,योगेश मांडगे,सुलतान बागवान,तेजेंद्र चौधरी,सागर मांडगे,चेतन अहिरराव,करण चित्ते,प्रशांत जगताप,विकास मोरावकर, अक्षय बारड आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, जि प सदस्य प्रतापराव पाटील, मुकुंद धनवडे, सागर पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, पप्पू भावे, अभिजीत पाटील, वाल्मीक पाटील, देवेंद्र आप्पा, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, नगरसेवक नंदकिशोर पाटील, समाधान पाटील, रोहित चौधरी आदी उपस्थित होते.