मोठी बातमी! टीममधून विराट कोहलीला डच्चू; ‘या’ खेळाडूंची निवड

Virat Kohli : विराट कोहली याने आशिया कप 2023 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध धमाकेदार शतक ठोकलं होतं. तसेच विराटने यासह 13 हजार धावाही पूर्ण केल्या. मात्र त्यानंतरही आता विराटला टीममधून डच्चू दाखवण्यात आला आहे.

टीम इंडियाने आशिया कप 2023 फायनलमध्ये आपल्या गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेवर 10 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 50 ओव्हर्सचा सामना हा अवघ्या 20 ओव्हरच्या आतच संपवला.

टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह याने 1 विकेट घेतली. तर त्यानंतर शुबमन गिल आणि ईशान किशन या सलामी जोडीने 51 धावा करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने 2018 नंतर आशिया कप जिंकला. या स्पर्धेत श्रीलंकेने फायनलपर्यंत चांगली कामगिरी केली. मात्र टीम इंडियासमोर श्रीलंकेने गुडघे टेकले. या स्पर्धेत सुपर 4 मधील बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि टीम इंडिया या चारही संघातील निवडक खेळाडूंनी चमकदार कामगिरीच्या जोरावर छाप सोडली.

आशिया कप पार पडल्यानंतर विस्डन क्रिकेटने स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 11 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विस्डन क्रिकेटने आशिया कप 2023 टीम निवडली आहे. यात टीम इंडियाच्या सर्वाधिक 6 खेळाडू आहेत. श्रीलंका टीमचे 2 खेळाडू आहेत. तर पाकिस्तानच्या 2 खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर बांगलादेशच्या एकमेव खेळाडूला संधी मिळाली. मात्र या टीममध्ये टीम इंडियाच्या विराट कोहली याला संधी मिळालेली नाही.