मुंबई : राज्य शासनाकडून तलाठी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक इच्छुक उमेदवारांना सर्व्हरमुळे अडथळा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून या भरतीप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील तलाठी भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात विधानसभेत मागणी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण यासंदर्भात महसूलमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू, तसेच, याआधी एकदा मुदतवाढ देण्यात आली होती, असेही फडणवीसांनी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य शासनाकडून राज्यात तलाठी पदासाठी मेगाभरती केली जात असून ही भरती महसूल विभागाकरिता होणार आहे. तसेच, राज्यात ४६४४ हजार रिक्त जागांसाठी महसूल आणि वनविभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान सर्व्हरचा गोंधळ उडाल्याने अनेकांना अर्ज भरण्यास विलंब झाला आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय महसूल व वनविभागाने घेतला आहे.