मोठी बातमी! दहावीचा निकाल जाहीर; ‘या’ विभागाची बाजी

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.
विभागवार निकाल :
  • कोकण- ९८.११%
  • कोल्हापुर- ९६.७३%
  • पुणे- ९५.६४%
  • मुंबई- ९३.६६%
  • औरंगाबाद- ९३.२३%
  • अमरावती- ९३.२२%
  • लातूर- ९२.६७%
  • नाशिक- ९२.२२%
  • नागपूर- ९२.०५%
कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in