मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक निर्णय, वाचा काय म्हणालेय ?

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागल आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर भाजपची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचा पराभव का झाला ? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली.

मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवाय लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे.

पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.