क्रिकेट अकादमी सुरू करण्याच्या नावाखाली कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची १५ कोटींची रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या फसवणूकप्रकरणी धोनीने त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध रांची न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला असून धोनीने असा दावा केला आहे की त्याच्या दोन्ही माजी व्यावसायिक भागीदारांनी क्रिकेट अकादमी उघडण्याच्या कराराचा भंग करून आपली १५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
कराराच्या अटींनुसार, अर्का स्पोर्ट्सला फ्रँचायझी शुल्क भरणे आणि नफा वाटून घेणे बंधनकारक होते. परंतु कंपनीने तसे केले नाही. तसेच, धोनीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनेक प्रयत्न करूनही करारात दिलेल्या अटी व शर्तींचा अवमान करण्यात आला आहे.