मोठी बातमी ! नरेंद्र मोदी देणार राजीनामा? राजधानीत घडामोडींना वेग

नवी दिल्ली । लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती आले असून यात भाजपाप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्य असलेल्या 272 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. पण भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत.

मात्र यावेळी निकाल वेगळा आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत घडामोडीना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कॅबिनेट बैठक बोलवली आहे. आजच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडी सत्तास्थापनेसाठी औपचारिक दावा करण्याची शक्यता आहे.

या बैठकीसाठी बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. आज एनडीएच्या संयोजक पदावर चर्चा होणार असून आजच्या बैठकीत शपथविधीवर पण चर्चा होवू शकते, अशी चर्चा आहे.

यापूर्वी 2014 आणि 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनुक्रमे 282 आणि 303 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळी निकाल वेगळा आहे. २०२४ च्या लोकसभेत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत.तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 272 ही मॅजिक फिगर एनडीएने पार केल्याने ते सत्तास्थापनेसाठी दावा करतील.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल मित्र पक्षांशी चर्चा झाली. अमित शाह यांनी फोनवरून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. औपचारिकता म्हणून हा राजीनामा देण्यात येईल, त्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत राष्ट्पती त्यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार पाहण्याची सूचना करू शकतात. या नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडी सत्तास्थापनेसाठी औपचारिक दावा करण्याची शक्यता आहे.

मोदींचा शपथविधी कधी ?
दरम्यान मोदी सरकारच्या शपथविधीसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 9 जूनला (रविवार) मोदी सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाने काही महत्वाची पावलं उचलली आहे. त्यामुळे आजपासून 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाईल. येत्या 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.