मोठी बातमी ! नितीश कुमारांसोबत दिल्लीला निघाले तेजस्वी यादव; कुणाच्या बैठकीला राहणार हजर ?

लोकसभा निवडणूक-2024 च्या निकालानंतर आज बुधवारी एनडीए आणि इंफिया आघाडी यांची दिल्लीला होत बैठक आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव पाटणाहून दिल्लीला रवाना झाले आहेत. नितीश एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. हे दोघे ज्या विमानाने येत आहेत, त्याचे छायाचित्रही समोर आले आहे.

विमानात समोरच्या सीटवर नितीश कुमार आणि मागे तेजस्वी यादव बसले आहेत. दोघेही हसताना दिसत आहेत. या निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने 12 जागा जिंकल्या आहेत. नितीश कुमार एनडीएचा भाग आहेत. निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे नितीश कुमार यांना पक्षात घेण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.

या सर्व चर्चेदरम्यान आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नितीश कुमार यांनी कठोर निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे. सिद्दीकी म्हणाले, भाजपला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश यांनी एकत्र यावे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांनी भाजप बहुमतापासून दूर गेल्याचे म्हटले आहे.

एनडीएची बैठक
दिल्लीत आज एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा आढावा घेऊन सरकार स्थापनेवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडूही उपस्थित राहणार आहेत. या दोन नेत्यांशिवाय भाजप आणि इतर मित्र पक्षांचे प्रमुख नेतेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी नव्या सरकारचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे कारण भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

 इंफिया आघाडीची बैठक 
दिल्लीत आज इंफिया आघाडीची बैठकही होणार आहे. तेजस्वी यादव शिवाय काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांचे प्रमुख नेतेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.