राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ते चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. पुण्याच्या पालकमंत्रपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार चांगलेच कामाला लागले आहेत.
अजित पवार यांचा पुण्यात आज सकाळपासून बैठकांचा धडाका सुरु आहे. पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका सुरू आहेत. अजित पवार आज सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्किट हाऊस येथे बैठका घेत आहेत. त्यांनी सकाळपासून विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.
अजित पवारांकडून पुणे शहरासह जिल्हाभरातील अनेक कामांचा आढावा घेण्यात आलाय. पुणे शहरातील महानगरपालिका आयुक्तांसह, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसोबत अजित पवारांनी आढावा बैठक घेतलीय. अजित पवारांच्या सकाळपासून आठ पेक्षा अधिक महत्त्वाच्या विषयांवर बैठका झाल्या आहेत.