नवीन आर्थिक वर्षाचा (2024-25) पहिला महिनाही आता संपण्याच्या मार्गावर आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आणि आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांवरील शुल्कामध्ये अनेक बदल दिसून येतील. पुढील महिन्यात पैशांशी संबंधित नियमांमध्ये कोणते बदल पाहायला मिळू शकतात ते जाणून घेऊया.
येस बँकेत होणार आहेत बदल
येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, विविध प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लकमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता येस बँकेच्या प्रो मॅक्स बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक 50,000 रुपये आणि कमाल शुल्क 1000 रुपये करण्यात आले आहे. तर “प्रो प्लस”, “यस रिस्पेक्ट एसए” आणि “येस एसेन्स एसए” खात्यांसाठी, किमान सरासरी शिल्लक मर्यादा रुपये 25,000 आणि कमाल शुल्क रुपये 750 आहे. “Account Pro” मध्ये किमान शिल्लक 10,000 रुपये आहे आणि त्यातील कमाल शुल्क 750 रुपये आहे.
शहरवासीयांना भरावे लागणार आहे अधिक शुल्क
आयसीआयसीआय बँक सेव्हिंग कार्डशी संबंधित नियमांमध्येही बदल करणार आहे. आता ग्रामीण भागातील ग्राहकांना डेबिट कार्डसाठी 99 रुपये आणि शहरी भागात 200 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच बँकेने 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यानंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. IMPS व्यवहाराची रक्कम प्रति व्यवहार रुपये 2.50 ते 15 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
10 मे पर्यंत संधी
HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये ते 10 मे पर्यंत सामील होऊ शकतात. या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना 0.75% अतिरिक्त व्याजदर उपलब्ध आहे, ज्याद्वारे ते 5 ते 10 वर्षांच्या FD योजनेवर 7.75% व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक ५ कोटी रुपये जमा करू शकतात.
तेलाच्या किमतीत बदल
आपल्या सर्वांना माहित आहे की, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात, त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.