काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्यावर केलेली टीका चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांवर धार्मीक भावना दुखवणारी टिप्पणी केल्यामुळे प्रियंका यांना निवडणूक आयोगाने गुरुवारी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
राजस्थान दौऱ्यादरम्यान प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिर भेटीशी संबंधित दानपेटीत लिफाफा टाकण्यावर टिप्पणी केली होती. या प्रकरणी भाजपने प्रियंका गांधी यांच्या विरोधात तक्रार केली होती, त्यानंतर आयोगाने त्याची दखल घेत प्रियंका गांधींना नोटीस पाठवली होती. आयोगाने प्रियंका ३० ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.
भाजपने बुधवारी प्रियंका यांच्यावर राजस्थानमधील निवडणूक प्रचारादरम्यान खोटे दावे करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धांना दुखावल्याचा आरोप भाजपने केला होता. निवडणूक विभागाच्या नोटीसनंतर प्रियंका गांधी आपल्या व्हॉट्सअॅप चॅनलवर म्हणाल्या, ‘माझ्या एका शब्दावर भाजपचे लोक इतके संतापले की त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी म्हणालो होतो की, मी टीव्हीवर पाहिले आहे की, पंतप्रधान एक लिफाफा घेऊन देवनारायणजींच्या मंदिरात आले होते, ते उघडले असता त्यात २१ रुपये आढळले.”