मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. दोन दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.