मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराने दिला राजीनामा

मुंबई । राज्यात मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र झालं असून मराठा नेते मनोज जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. त्यानुसार आता लोकप्रतिनिधींचं राजीनामा सत्र सुरु झालंय. यातच बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलाय.

बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

“महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे”, असं लक्ष्मण पवार विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.