भुसावळ : रावेर लोकसभेसाठी आपण उमेदवारी मागितली नव्हती, मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिल्याने आपण तयारी केली कार्यकर्त्यांनी आपले जोरदार स्वागत केल्याने आपली ताकद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली तर दुसरीकडे धनशक्ती असलेल्या उमेदवाराला पक्षाने अचानकपणे तिकीट जाहीर केल्याने कार्यकर्ते प्रचंड दुखावले आहेत. मात्र आपण आता मोठा निर्णय घेत आहोत रावेर लोकसभेसाठी 24 एप्रिल रोजी अर्ज दाखल करू, अशी घोषणा माझी आमदार संतोष चौधरी यांनी केली आहे. दरम्यान, ऐनवेळी पक्षात आलेले उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी हे राष्ट्रवादीत बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, अखेर ते स्पष्ट झाले.
भुसावळतील मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रहारचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक उल्हास पगारे, सलीम पिंजारी, संगीता ब्राह्मणे, आऊ चौधरी, दीपक मराठे, फिरोज शेख, राजेंद्र चौधरी, अशीख खान, शेर खान, विनोद कोळी, रमेश पाटील आद उपस्थित होते.