---Advertisement---

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्व मंत्र्यांची बैठक

---Advertisement---

मुंबई : राज्यातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवले आहे. आज संध्याकाळी ७ वाजता मंत्र्यांना वर्षा निवासस्थानी बोलवण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावरील बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यातच आता मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या वतीने शिवसेनेच्या दोन्ही गटांना वेळापत्रकाबाबत सूचित करण्यात आले आहे.
१३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची बैठकही बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये आमदार अपात्रतेप्रकरणी चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---