नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नुकतेच हिज्ब-उत-तहरीर (HUT) कारवाई केली आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील १६ लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
हिजबुल-उल-तहरीरमधील १६ जणांच्या अटकेबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जी माहिती समोर आली त्या माहितीच्या आधारे आरोपींची चौकशी केली जात आहे. तसेच आम्ही लव्ह जिहाद, धर्मांतर आणि त्यानंतर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याच्या विरोधात आहोत. असे ही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
या प्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, कट्टरपंथी संघटना हिज्ब-उत-तहरीरशी संबंध असल्याबद्दल १६ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्राध्यापक आणि जिम ट्रेनर अशा काही लोकांचा समावेश आहे. या कारवाईतील लोकांचा ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये प्रथमतः सामील असल्याची माहिती आहे.
तसेच गेल्या काही महिन्यांत तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या ज्यात जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी), पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि एचयूटीशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली.HUT प्रकरणात झाकीर नायक कनेक्शनची एटीएस चौकशी करणार आहे. इस्लामिक कट्टरतावादी गट हिज्ब-उत-तहरीर मधील कार्यकर्ते हे इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे कट्टर अनुयायी आहेत.