---Advertisement---

मोठी बातमी! राजकीय पक्षांमध्ये उलथापालथी, एकनाथ शिंदेंना पहिला धक्का

---Advertisement---

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरुन एकीकडे सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्येही उलथापालथी होत आहेत.

विधानसभा निवडणुकीला वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्षबदलीला सुरुवात झाल्याची चित्र आहे. एकीकडे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

पांडुरंग बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा आहेत. दौलत दरोडा हे अजित पवार गटात आहेत.

त्यामुळे आता शहापूरमध्ये येत्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्यासमोर पांडुरंग बरोरा यांचं आव्हान उभं राहतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment