---Advertisement---

मोठी बातमी! राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

---Advertisement---

जयपूर ! राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका संघटनेच्या अध्यक्षाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी घरात होते. दोन जण स्कूटरवरून आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुखदेव सिंग यांना दोन गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. त्याचवेळी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची मोठी बातमी समोर येत आहे. याप्रकरणी जयपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment