आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. यावेळची निवडणूक ही प्रामुख्याने इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देशात ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु केली आहे. दरम्यान, केरळमधील वायनाड येथे भारत जोडो न्याय यात्रा काढत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी, ३१ जानेवारी रोजी त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला. या घटनेत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दगडफेकीनंतर कोणाला दुखापत झाली आहे का ? सध्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र केरळमधील वायनाड येथील काँग्रेस खासदार भारत जोडो न्याय यात्रा काढत असताना हा हल्ला झाला आहे. मात्र, हल्ला कुणी केला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.