जळगाव : महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पथकाना सापळा रचून वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती याला २५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पो.नि. अमोल वलसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ.प्रणेश ठाकुर यांनी कारवाई केली.