मोठी बातमी ! विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र; समोर आले मोठे अपडेट्स

पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराश करणारी बातमी आहे. विनेश फोगाटने तिचं ऑलिम्पिक मेडल गमावलंय. तिला ऑलिम्पिक स्पर्धेतू अपात्र ठरवले आहे, तिचे वजन काही ग्राम अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतलाय.

महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती. तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवलं होतं. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.

ऑलिम्पिक नियमानुसार, जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त होतं. नियमानुसार, कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पृष्टी केली आहे.